[ Helpline Number - 1800 - 233 - 0033 | 0712-2800400 | 7499699126 ]

Rakshabandhan @NCI

आज नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट ने आपल्या pediatric ward मध्ये रक्षाबंधनाचा छोटासा कार्यक्रम घ्यायचे ठरविले.

याप्रसंगी एनसीआय मधील लहान लहान पेशंट ची एक छोटीशी चित्रकला स्पर्धा आणि सोबतच राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. मुलांची कल्पकता आणि कलात्मकता पाहून आनंद तर झालाच, पण ही संधी मिळाल्याचा आनंद अधिक होता.

आज लहान मुलांच्या आयुष्यात सुध्दा कर्करोगा सारखे संकट उभे राहू पाहतंय. त्याचे गांभीर्य त्यांना नसतं, पण त्यांच्या पालकांना तर असतंच असतं. सततचा दवाखाना, औषधोपचार, वेदना ह्यामुळे करमणूक, सुप्त गुणांना वाव मिळणे ह्या आणि अशा गोष्टी मागे पडतात. यातून काही वेळ मिळावा, थोडा वेगळेपणा त्यांनाही अनुभवता यावा म्हणून ह्या “रक्षाबंधन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये एनसीआयचे मेडिकल डायरेक्टर डॉ. आनंद पाठक ह्यांचा समवेत डॉ. पंकज द्विवेदी (बालरोग विभाग प्रमुख) सहभागी झालेत. सिस्टर कुंजन, सिस्टर ममता तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक विभागातर्फे मालिनी जोशी आणि देवयानी जोशी ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.