Dr. Aabaji Thatte Seva Aur Anusandhan Sanstha

Location

JAMTHA |  DHARAMPETH

HelpLine

1800-233-0033


By  Dr. Abhinav Deshpande
Consultant Surgical Oncology
National Cancer Institute, Nagpur
     
On 03 June 2020

कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध वैद्यकीय पद्धती प्रचलित आहेत. जेव्हा कर्करोगाची लक्षणे आढळून आली तर डॉक्टर सर्वप्रथम मेडिकल एक्जॅमिनेशन करतात आणि त्यावरून पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देतात. या लेखात आपण डॉक्टर कुठकुठल्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

एफएनएसी : या चाचणीस ‘फाईन निडल अ‍ॅस्पिरेशन सायटोलॉजी’ म्हणजे एफएनएसी असे म्हणतात. जेथे गाठ असते, तेथे सुई टोचुन तेथील द्रव्य बाहेर काढतात. त्या द्रव्यापासून स्लाईड बनवून त्यामध्ये कर्करोगाचे पेशी आहेत का, हे शोधल्या जाते. जर त्यामध्ये कर्करोगाचे पेशी आढळल्या तर कर्करोगाचे योग्य निदान होऊ शकते. ही  कर्करोगाचे निदान करण्याची प्रचलित पद्धती आहे.

मॅमोग्राफी : मॅमा म्हणजे ब्रेस्ट आणि ग्राफी म्हणजे चित्रण. ही एक रेडियोलॉजीकल चाचणी आहे, ज्याद्वारे आपण स्थानाच्या कर्करोगाचे निदान करू शकतो. विशिष्ट एक्स-रे काढून त्यावरून काही काही रेडियोलॉजिकल चिन्ह असतात, त्यावरून कर्करोगाचे प्राथमिक निदान करता येणे शक्य आहे. 

बायप्सी : जेथे दिसणारी गाठ असते तेथील तुकडा काढल्या जातो आणि तेथील पेशींमध्ये कर्करोगाच्या पेशी आहेत का, याचा अभ्यास केल्या जातो. अनेकदा शल्यक्रियेनंतर ट्युमरचा तुकडा काढून त्याची बायप्सी केल्या जाते.

सीटी स्कॅन व एमआरआय : याशिवाय ज्या भागाचा कर्करोग आहे, तेथील असंतुलन तपासण्यासाठी आणि तेथील कर्करोगाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन व एमआरआयचा अभ्यास करून देखील कर्करोगाचे निदान तज्ज्ञांद्वारे केल्या जाते. जसे फुफ्फुसाचा असेल त्याचा सीटी स्कॅन वा एमआरआय करण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात.

सीटी गायडेड बायप्सी : सीटी स्कॅन केल्यानंतर ज्या भागात मॅलेग्नंसी अथवा कर्करोगाची लक्षणे आढळली तेथील अवयवांमध्ये कर्करोगाचा किती प्रभाव आहे हे बघण्यासाठी बायप्सी केल्या जाते. फक्त त्यासाठी सीटी स्कॅनचे मार्गदर्शन घेतल्या जाते. यामध्ये आपल्याला लक्षात येत की, त्या अवयवानवर कर्करोगाचा किती प्रभाव आहे.

बोन स्कॅन : कधी-कधी कर्करोगाचा प्रभाव हाडांपर्यंत पोहचतो. रुग्णाला एक विशिष्ट रिएजंट देऊन रुग्णाच्या शरीराचे स्कॅन केले जाते. यास न्युक्लिअर स्कॅन देखील म्हणतात. याद्वारे हाडांमध्ये कर्करोगाचा किती प्रभाव पडला आहे, हे जाणून घेता येते.

पॉजिट्रॉन इमिशन टोमोग्राफी : यास पेट स्कॅन असे म्हणतात. याद्वारे संपूर्ण शरीराची चाचणी केल्या जाते. त्यामुळे शरीरात कुठेही कर्करोग असेल तर तो शोधल्या जाते.

फ्रोजन सेक्शन बायप्सी : बायप्सीमध्ये हिस्टोपॅथोलॉजीच्या माध्यामतून तपासणी करतात. पण या सगळ्या प्रकाराला पाच ते सहा दिवस लागतात. मात्र, फ्रोजन सेक्शन बायप्सीमध्ये अगदी तासाभरात निदान होऊ शकते. शस्त्रक्रियेदरम्यान संबंधित ट्युमर कर्करोगाचा आहे नाही याचे त्वरीत निदान होते. जर कर्करोगाचे निदान झाले तर तो अवयव काढून टाकण्यासंबंधात निर्णय घेता येतो.

ट्युमर मार्कर : शरीरात जर ट्युमरची अ‍ॅक्टिव्हिटी असेल तर रक्तामध्ये त्याचे प्रमाण दिसू शकते. जेनेटिक स्टडीद्वारे त्याचा अभ्यास करता येणे देखील शक्य आहे.

लिक्विड बायप्सी : बायप्सीमध्ये तुकडा काढतो, पण यात रक्ताची चाचणी करून रक्तातील पेशींची हिस्टोपॅथोलॉजीद्वारे चाचणी करून कर्करोगाचे निश्‍चित स्वरुप सांगता येते शक्य आहे.!!!!!